Top News

नागरिकांनो सावधान; नगरपरिषद करीत आहे नागरिकांच्या जीवाशी खेळ #chandrapur #Korpana #Gadchandur

११ महिन्याच्या चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू
कोरपना:- गडचांदुर नगर परिषद होऊन ८ वर्ष झाले, माञ शहरातील समस्या या "जैसे थे" आहे. अनेक नागरिक समस्यांचे तक्रारी करून सुद्धा त्या सोडवल्या जात नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
अनेक महिन्यापासून पावसाळा सुरू झाला असून स्वच्छता विभागा कडून कसलीही शहरांमध्ये स्वच्छता वा नाल्या साफसफाई केल्या गेल्या नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली आहेत. त्याचप्रमाणे दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात यावर्षी मोठी वाढ झाली आहे.
नगरपरिषेद ने सर्व प्रभाग स्वच्छ ठेवून साफसफाई व नाल्या फवारणी करणे आवश्यक होते, माञ नगर परिषदेकडून कुठेही शहरांमध्ये फवारणी करण्यात आलेली नाही तर काही मोजक्याच ठिकाणी नगरसेवकांच्या घराजवळ फवारण्या करण्यात आल्या अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. या पावसाळ्यात आतापर्यंत डेंग्यू ने पाच ते सहा नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. व दिनांक 15 सप्टेंबर ला एका ११ महिन्याच्या चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाला. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगरपरिषद ने आजपर्यंत कुठेही फवारणी केलेली नाही खुल्या जागेवर वा खाली असलेल्या प्लॉट यात पाणी साचलेल आहे पण याकडे नगर परिषद मात्र लक्ष देत नाही अश्या रोगराईला सर्वस्वी जबाबदार ही नगरपरिषद व नगरपरिषदचे कर्मचारी आहे. कोणतीही सूचना व निवेदन पत्र दिले असता त्यावर कोणतेही कारवाई करत नाही असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने