सर्पदंशाने बैलाचा मृत्यू #chandrapur #pombhurna

पोंभूर्णा :- येथील शेतकरी नरेंद्र राजेश्वर गुरूनुले यांच्या बैलाचा शेतात चारा खात असताना सर्पदंशाने मृत्यू झाला. बैलाच्या मृत्यूने शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे.
पोंभूर्णा येथील शेतकरी नरेंद्र गुरूनुले हे श्रीकृष्ण विद्यालयाच्या मागची शेती अरदबटाईने करतात.दि. १६ सप्टेंबरला दुपारी ३ वाजताच्या सुमारास बैल चरत असतांना अचानक बोळीच्या पारीवर निपचीत पडला. बैल मालकाच्या लक्षात येताच तो बैलाजवळ गेला. बैल तोंडातून फेस काढत असल्याने कोणत्या तरी विषारी सापाने दंश केला असल्याने बैलाचा मृत्यू झाला. पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनेची पुष्टी केली.
घटनेची माहिती मिळताच तलाठी संतोष कोला हे पंचनामा केले. सदर घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई पोटी शासनाने शेतकऱ्याला ३० हजार रूपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत