Top News

सामाजिक कार्यातून साजरा होत आहे गणेशउत्सव #chandrapur #Korpana


साई शांती युवा गणेश मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- दिवसेंदिवस डोळ्याच्या आजारात वाढ होत आहे. कोरपना या आदिवासीबहुल तालुक्यात गरिबीमुळे अनेक रुग्ण डोळ्याच्या उपाचारापासून वंचित राहतात. मोतिबिंदू, अंधत्व, पडदा येणे व इतर डोळ्याच्या आजाराची मोफत तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा अनुषंगाने शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जवळपास १४० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला व त्यातून ५० जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. समता फाऊंडेशन, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर, आचार्य ग्रामीण रुग्णालय सावंगी यांचे विशेष सहकार्य मंडळाला लाभले. यावेळी नेत्रचिकीत्सक डॉ. बुराण व त्यांच्या टीमने नेत्रोपचार केले. दरम्यान मंडळातील सर्व युवकांनी नेत्रदानाचा संकल्प केला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक अरविंद डोहे, उद्घाटक डॉ घाटे, विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉ बुरहान, साळवे मॅडम , चीमुरकर उपस्थित होते.
डॉ बुऱ्हान यांनी नेत्रदान या विषयावर मार्गदर्शन केले तर अरविंद डोहे यांनी मंडळाच्या उत्तम कार्याचे अभिनंदन केले व मंडळाचे अध्यक्ष वैभव राव म्हणाले की, टिळकांनी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने गणेशोत्सवाची सुरुवात केली. यातून सामाजिक हीच साधले जावे ही त्यांना अपेक्षा होती. हा व्यापक जनहिताचा विचार मंडळ पुढे घेऊन जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंशुल ताकसांडे तर प्रास्ताविक वैभव राव यांनी केले, तर आभाप्रदर्शन अक्षय मेश्राम यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश चिने, सुहास बोंडे, आकाश गायकवाड, सुमित नागे, दत्तू पानघाटे, , अतुल बोबडे,अभिजित पाचभाई, मयूर येडमे, संकेत बोढे, सूरज बोबडे, विशाल राव, नंदकिशोर ठावरी, , गिरीश धवणे, सहिल नागे,नीरज मालेकर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने