शार्ट सर्कीटमुळे माजरी स्थानकावर पॅसेंजर गाडी थांबली #chandrapur


प्रवाशांनी घातला गोंधळ
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- बल्लारपूरवरून सुटलेल्या पॅसेंजर गाडीला माजरी रेल्वे स्थानकावर शार्ट सर्कीट झाल्यामुळे गाडी थांबून गाडीच्या डब्यातील पंखे आणि लाईट बंद झाल्याने प्रवाशांनी एकच गोंधळ घातला.
ही घटना आज दि.१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजताच्या दरम्यान घडली. भांदक रेल्वे स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर माजरी येथे येताच शार्ट सर्कीट झाला. त्यामुळे प्रवाशांनी डब्यातून बाहेर उड्या मारल्या. गाडी बंद पडल्यामुळे सर्व प्रवाशी माजरी स्थानकावर एकत्र आले. बराच वेळ होऊनही गाडी सुरू न झाल्याने प्रवाशी त्रस्त झाले. त्यांनी येथे प्यायला पाणी नाही.
आमची गैरसोय होत आहे.असा आरोप करत त्वरीत पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली. दरम्यान रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा पाण्याच्या गैरसोयीचा आरोप फेटाळून लावत पाण्याची व्यवस्था दाखवून दिली. वृत्त लिहीस्तोवर प्रवाशी माजरी रेल्वे स्थानकावर ताटकळत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत