Top News

सरदार पटेल महाविद्यालयात रक्तदान, दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन #chandrapur


चंद्रपूरभूषण स्व. शांताराम पोटदुखे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजन
चंद्रपुर:- रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर, सर्वोदय शिक्षण मंडळ, सरदार पटेल महाविद्याल चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार पटेल महाविद्यालयातील शुक्रवार दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 वा. स्वर्गीय श्री शांताराम पोटदुखे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्य रक्तदान, दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात 38 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. तसेच विद्यार्थ्यांनी दंत चिकित्सा शिबिराचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर अध्यक्ष अजय जयस्वाल, सचिव संतोष तेलंग, रक्तदान शिबिराचे प्रकल्प निर्देशक रोटे श्रिकांत रेशिमवाले, रोटे. संदीप रामटेके, रोटे. सुरज वाघ दंत चिकित्सा शिबिराचे प्रकल्प निर्देशक रोटे. डॉ. सुशिल मुंधडा, रोटे. डॉ. प्रविण घोडे, डॉ. हेडगेवार रक्तपेढी, नागपूर डॉ. बुक्कावार हॉस्पिटल सेंटर चंद्रपूर, चमू, जनसंपर्क अधिकारी प्रविण पाटिल, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार उपस्थित होते.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विजय ई. सोमकुवर रासेयो कार्यक्रम अधिकारी कुलदीप आर गोंड, NCC प्रमुख सतीश कनाके, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी पार पडली..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने