प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचे उदिष्ट वाढवा #Korpana


केंद्रीय आवास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची मागणी
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- केंद्र सरकारने गरीब नागरिकांचे घरकुलांचे स्वप्न साकार करण्याकरीता प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे,त्यामुळे सदर योजनेचा लाभ लवकरात लवकर सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहविण्याकरीता सदर योजने उदिष्ट वाढविण्यात यावे याकरिता केंद्रीय पेट्रोलियम, आवास व शहरी विकासमंत्री यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी निवेदाद्वारे मागणी केली.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रत्येक ग्रापंचायती व शहरी भागात ' ड ' मंजूर प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे,परंतु सदर प्रतीक्षा यादीमध्ये दर वर्षाला अतिशय कमी प्रमाणात घरकुल मंजूर करण्यात येत आहे,त्यामुळे मंजूर प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांपर्यंत सदर योजनेचा लाभ पोहचायला उशीर होत आहे,त्यामुळे अनेक लाभार्थी घरकुल प्रतीक्षा यादीमध्ये मंजूर होऊन सुद्धा प्रत्यक्ष मंजूर न झाल्यामुळे प्रतीक्षा करीत आहे,सदर लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर व्हावे याकरिता दरवर्षी मंजूर घरकुलांचे उदिष्ट वाढविणे अतिशय आवश्यक आहे,तेव्हाच सर्व लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळावा याकरिता केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांना भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत