Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

उद्यापासून चंद्रपुरात 'भाऊचा दांडिया'ची धूम #chandrapur


सलग दहा दिवस समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
चंद्रपूर : कोविडच्या संकटानंतर यंदा सर्व उत्सव निर्बंधाविना पार पडत आहे. सर्वांच्या जीवनात आधीसारखा आनंद येण्याकरिता चंद्रपुरात उद्यापासून खासदार सांस्कृतिक मोहोत्सवाअंतर्गत 'भाऊचा दांडिया'चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 'भारत जोडो आंदोलना'च्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांची दहा दिवस उपस्थिती राहणार आहे. यात दोन दुचाकी वाहनासह रोख बक्षिसे देखील देण्यात येणार आहे. हा रंगारंग कार्यक्रम चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंडवर २६ सप्टेंबर ते ५ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी सहा ते रात्रौ १० वाजता संपन्न होणार आहे.
नवरात्रोत्सव म्हटले कि, गरबा - दांडिया खेळण्याकडे सर्वांचा कल असतो. विशेष करून तरुणाईमध्ये गरबा खेळण्याचा जोश ओसंडून वाहतो. त्यासाठी चंद्रपूर शहरात पहिल्यांदाच मोठ्या उत्सवात नवरात्र उत्सवानिमित्य लाईव्ह संगीतमय दांडियाचे आयोजन केले आहे. यामध्ये समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

या खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत 'भाऊचा दांडिया' उत्सवानिमित्त आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. त्यात दोन चॅम्पियन्स ला ई दुचाकी, व रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन बाळू धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी तथा मराठा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.

--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत