एकाच कुटुबांतील चौघांनी केले विशप्राशन; महिलेचा मृत्यू #poison

ब्रह्मपुरी:- येथील तहसील कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले रमाकांत ठाकरे यांच्या कुटुबांतील चौघांनी विश प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील देलनवाडी अपार्टमेंट येथे शनिवारच्या रात्री घडली असून रविवारला उघडकीस आली आहे. या चौघापैकी रमाकांत ठाकरेंच्या पत्नीचा मृत्यूू झाला असून रमाकांत ठाकरे व दोन मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त समोर आले आहे.
मुलांना नोकरी लागत नसल्यामुळे घरी नेहमी फटके उडायचे. त्यातच आर्थिक चणचणीमुळे लग्नाचे वय होऊनही नोकरी न लागल्याने याविवंचनेतच सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. गीता ठाकरे यांचा जास्त विशप्राशन सेवनाने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
प्रकृती गंभीर असलेल्यापैकी नावे: रमाकांत दामोदर ठाकरे वडील वय 53 राहुल रमाकांत ठाकरे 27 मनोज रमाकांत ठाकरे वय 26 हे गंभीरित्या जखमी असून त्यांना गडचिरोली येथील सामान्य जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत