गडचांदूर येथे एकदिवसीय पोलिस प्रशिक्षण तथा मार्गदर्शन शिबिर

प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयात यशस्वी रित्या संपन्न
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना :- गडचांदूर.दि.23/09/2022... नागपुर शहर पोलिस संघात नुकतीच निवड झालेले सत्कारमूर्ति व मार्गदर्शक मा. रविन्द्र ढवस यांच्या उपस्थितीत प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयात एक दिवसीय पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले.

मार्गदर्शन पर भाषणात मा.रवींद्र ढवस यांनी स्पर्धा परिक्षेतून यश प्राप्त करायचे असेल तर विद्यार्थाने सतत प्रयत्न करणे आवश्यक असून अपयश आल्यास खचून न जाता पुन्हा जिद्दीने आपल्या ध्येयाचा पाठलाग करावा असे प्रतिपादन केले.तर अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे सर यांनी प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालय शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदशन नियमितपणे स्पर्धा परीक्षा वर्ग घेणारे महाविद्यालय असून महाविद्यालयाची वाटचाल ही अधिकारी वर्ग घडविण्याकडे होत असून ही महाविद्यालयातील विद्यार्थासाठी आनंदाची बाब असल्याचे मत स्पष्ट केले.


मा.रवींद्र ढवस यांनी विध्यार्थ्यांना पोलिस भरतीतील शारीरिक क्षमता चाचणी याविषयी मैदानावर प्रत्यक्षरित्या मार्गदशन केले.सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्रा.अरविंद मुसने सर,प्रा.पंकज देरकर,प्रा.मनीषा मरसकोल्हे,प्रा.महेश मडावी,प्रा.ऐजाज शेख,वर्ग प्रतिनिधी प्रतीक्षा चिंचोलकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन नेहा लांडे,प्रास्ताविक रुपाली टेकाम तर आभार प्रतीक्षा चिंचोलकर हिने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेणू मॅडम,सुरज तलांडे,सांस्कृतिक प्रमुख पूनम चौधरी व विध्यार्थी वर्गाने परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत