(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- दिनांक 24/09/22 रोजी चंद्रपूर येथील ND हॉटेल मध्ये केंद्रीय शहरी आवास मंत्री हरदीप सिंग पुरीजी यांची भेट घेऊन जिवती नगर पंचायत शहरातील प्रधानमंत्री आवास योजना येथील घरकुल मंजूर असून सुद्धा वन विभागाच्या जाचक अटीमुळे लाभार्थ्याना त्यांचा लाभ मिळत नाही. ही समस्या घेऊन आज जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती महेशजी देवकते तसेच सरपंच पुंडलिकजी गिरमाजी ,युवा नेते विजय गोतावळे, फरीद भाऊ शेख , तिरुपती कुंडगिर, मारोती कुंटेवाड, रुपसिंग राठोड यांनी चंद्रपूर येथे ती समस्या घेऊन निवेदन दिले. समस्या तात्काळ सोडवून तेथील लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल मिळावे यासाठी विनंती केली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत