Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी पोंभूर्णा पोलिसांचा पथसंचलन #pombhurna #police


पोंभूर्णा :- पोंभूर्णा शहरातील गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचा संदेश देत पोंभूर्णा पोलिसांनी पोलिस व होमगार्ड यांच्या वतीने पोंभूर्णा शहरातून पोलिस पथसंचलन काढण्यात आले.यावेळी पोलिस व होमगार्डचे चाळीस जवान उपस्थित होते.
पोंभूर्णा शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातो.गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचा संदेश देत पोंभूर्णा पोलिसांनी पोलिस व होमगार्ड यांच्या वतीने पोंभूर्णा शहरातून पोलिस पथसंचलन काढण्यात आले. गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, गर्दी जास्त होऊ नये, संवेदनशील जमावाचे ठिकाणात पोलिस बंदोबस्त ठेवणे, विसर्जन स्थळी पोलिस मोठ्या संख्येने तैनात राहणार आहेत. पोलिस ठाण्याचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आलेल्या पंथसंचालनात पोलिस व होमगार्ड असे ४० पेक्षा जास्त जवान उपस्थित होते. शहरातील शास्त्री नगर,जुना बाजार चौक,गांधी चौक, हनुमान चौक, आंबेडकर चौक येथून पंथसंचालनाच्या माध्यमातून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचा संदेश देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत