वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

Bhairav Diwase

गोंडवाना विद्यापीठ पदवीधर निवडणूक 2022
चंद्रपूर:- दि. 4 सप्टेंबर रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सरदार पटेल महाविद्यालयात आपला मतदानाचा हक्क बजावला.
अभाविपकडून खुल्या प्रवर्गातील प्रशांत दोंतुलवार, यश बांगडे, स्वरूप तारगे, सागर वझे, तर राखीव प्रवर्गातून एसटीच्या योगिता पेंदाम, व्हिजे-एनटीचे गुरूदास कामडी, एससीचे जयंत गौरकार, ओबीसीचे धमेंद्र मुनघाटे आणि महिला राखीव गटाच्या किरण गजपुरे रिंगणात उभे होते.
गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीधर गटातील निवडणुकीत सर्वाधिक नोंदणी करण्यापासून तर प्रचार आणि नियोजनाच्या बाबतीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि शिक्षण मंचनी परीश्रम घेतले. दि. 7 आणि 8 सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे. यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि शिक्षण मंचाचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.