Top News

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दाखवले माणुसकीचे दर्शन #chandrapur #Rajura

राजुरा:- महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी माणुसकीचे दर्शन दाखवले. रानडुक्कराच्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याची रात्री 12 वाजताच्या नंतर रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
चुनाळा येथील शेतकरी अजय नथ्थू कार्लेकर याला 2 सप्टेंबर ला शेतात काम करीत असतांना रानडुक्कराने हल्ला करुन गंभीर जखमी केले. त्यांचेवर उपजिल्हा रूग्णालय राजुरा येथे उपचार सुरु आहे. ही माहिती राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी राजुरा येथील (3 सप्टेंबर) दौऱ्यात ना. सुधीर मुनगंटीवार यांना सांगितली. परंतू राजुराच्या कार्यक्रमाला उशिर झाल्यामुळे भेट घेता आली नाही. पण या घटनेची आठवण ठेऊन गडचांदूर चा कार्यक्रम आटोपून रात्री 12 वा. नंतर आवर्जुन दवाखान्यात जाऊन गंभीर जखमी शेतकऱ्यांची भेट घेउन विचारपूस केली व रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. कुळमेथे यांना योग्य उपचार करण्याच्या सुचना दिल्या. व तसेच उपस्थित असलेले उप विभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांना नियमानुसार वेळेत जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याच्या सुचना दिल्या.


यावेळेस माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रभारी तहसिलदार गांगुर्डे, वन परिक्षेत्र अधिकारी येल्केवाड, कैलाश कार्लेकर, मत्स्यव्यवसाय संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर पचारे, माजी अध्यक्ष संजय कार्लेकर, घनश्याम कार्लेकर, संदीप पारखी, रत्नाकर पायपरे उपस्थित होते.
घटनेचे गांभीर्य, गरीब शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव मनात ठेऊन रात्री 12 वाजताच्या नंतर येवढा उशिर झाला असतांना, एवढ्या मोठ्या पदावरचा मंत्री असतांना संबंधिताना फोन वर आदेश देऊन मोकळे झाले असते. परंतू तसे न करता सुधीर भाऊनी त्यांच्यामध्ये गरिबाप्रती असलेली सदभावना त्यांना स्वस्थ बसू देत नाही व प्रत्यक्ष भेट घेतल्याशिवाय समाधान होत नाही. म्हणुनच सुधीर भाऊंनी रात्री 12 च्या नंतर जखमी शेतकऱ्याची प्रत्यक्ष भेट घेऊन माणुसकीचे दर्शन घडविल्या बद्दल नातेवाईक, रुग्णालयातील रुग्ण व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने