नीट परीक्षेतील अपयशाच्या भीतीने विद्यार्थ्याची आत्महत्या #suicide

Bhairav Diwase
0

एटापल्ली:-: एटापल्ली जवळील पद्देवाही (टोला) येथील हर्षद सदु तलांडे (१८) याने विष प्राशन करुन आत्महत्या केली. हर्षद हा गुरुपल्लीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य रुनिता तलांडे व बिड्री जिल्हा परीषद शाळेतील शिक्षक संदु तलांडे यांचा मुलगा आहे. त्याने यापूर्वी नागपूरला जाऊन नीट परीक्षा दिली होती, पण परीक्षेत कमी गुण मिळाले.
मागील महिन्यात त्याने पुन्हा नीटची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल लागायचा आहे. परीक्षा दिल्यानंतर १९ ऑगस्टला तो घरी परत आला होता पण नीट परीक्षेत अपेक्षित यश मिळेल की नाही या तणावात तो रहात होता.
अशातच मंगळवारला पहाटे ५.३० च्या सुमारात त्याने घरी विष प्राशन केले. त्याला ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे भरती करण्यात आले. येथून अहेरी येथे रेफर करण्यात आले. अहेरीवरुन चंद्रपूरला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र बुधवारी पहाटे २.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. शिक्षक संदु तलांडे यांना एक मोठी मुलगी असून हर्षद हा एकुलता एक मुलगा होता.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)