Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

एकता शारदा महिला मंडळ तर्फे अंधश्रद्धेपासून जनजागृती कार्यक्रम संपन्न.

निस्वार्थपणे एखाद्याची केलेली मदत पुण्याचे काम असते- श्री. राहुल चव्हाण


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगतसिंग वधावन, विरुर स्टेशन
विरूर स्टेशन:- राजुरा तालुक्यातील विरूर येथे एकता शारदा महिला मंडळाने तरुण पिढीला अंधश्रद्धेपासून परावृत्त व शिक्षणासाठी कसे जागृत करायचे , या उद्देशाने नवरात्रीनिमित्त दररोज अनेक उपक्रम राबविले आहे . असा एक उपक्रम २ ऑक्टोबरला राबविण्यात आला यावेळी जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धानोरा येथील पोलीस पाटील कैलास चहारे यांनी अनेक प्रकारचे प्रयोग दाखवून अंधश्रद्धेवर मार्गदर्शन केले 
    आपण केलेल्या प्रयत्नामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचत असेल तर त्यासारखे दुसरे पुण्याचे काम कोणतेच नाही , अशा कामांमुळेच आपला ईश्वरही आपल्याला पावेल असे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांनी केले.
    यावेळी वृद्ध गरजू महिलांना साडी चोळी , वृद्ध पुरुषांना पोशाख , ११ शाळकरी मुलांना कपडे , महिलांसाठी निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर , गावातील ग्रामपंचायत सफाई कामगारांचा सत्कार व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत देण्यात आली यावेळी पोलीस हवालदार माणिक वाग्धरकर प्राथमिक आरोग्य केंद्र विरूर येथील डॉ . ताडे उपस्थित होते यशस्वितेकरिता लोकमुद्रा खोबरे , उषा पाठक , मालाबाई खोबरे , पंचफुला पेटकर कमलाबाई बारसागडे , राजू ईग्रपवार गणेश बारसागळे , रवींद्रसिंग टाक , गुड्डु शेख यांनी सहकार्य केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत