पैनगंगा वेकोली येथे स्थानिक युवकांची रोजगारासाठी धडक #chandrapur #Korpana

Bhairav Diwase
0

भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात उपप्रबंधक सुब्बारेड्डी यांना निवेदन
कोरपना:- कोरपना तालुक्यातील विरुर गाडेगाव येथील पैनगंगा ओपन कॉस्ट माईन्स कंत्राटी कंपनी कार्यरत असून सदर कंत्राटी कंपनीमध्ये स्थानिक गावातील बेरोजगार युवकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात पैनगंगा वेकोली येथे धडक देऊन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात शाखा उपप्रबंधक सुब्बारेड्डी यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये विरूर गाडेगाव येथील ग्रामपंचात अंतर्गत सोनुर्ली,बोरगाव व गाडेगाव तसेच विरूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बेरोजार युवकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.

तसेच पुनर्वसित नवीन विरूर येथे स्मशानभूमी शेडची व्यवस्था करणे, शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे,गावात विद्युत पुरवठा करून देणे अश्या विविध प्रकारच्या मागण्याकरीता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी वेकोलीचे शाखा उपप्रबंधक सुब्बारेड्डी यांची भेट घेतली सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले.
आपण येणाऱ्या काळात स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देऊ असे यावेळी उपप्रबंधक सुब्बारेड्डी यांनी स्थानिक युवकांना सांगितले.
यावेळी श्याम देवतळे,भारत चौधरी,अंकुश काकडे,भिकाजी राजुरकर,प्रकाश डवरे,विशाल खाडे स्वप्निल बंडेकर,चंद्रभान पाचभाई मारोती आत्राम,नितेश आसुटकर विशाल कोंगरे,सुरेश लोहे,भारत चौधरी,अरुण चौधरी,नितेश नक्षिने दिवाकर मुठलकर,गणेश कांबळे,प्रशांत कांबळे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)