सिंदेवाही:- शेतजमिनीच्या वादातून पोटच्या पोरीने जन्मदात्या आईचा खून करून मृतदेह जमिनीत पुरल्याची खळबळजणक घटना सिंदेवाही तालुक्यातील नलेश्वर येथे उघडकीस आली आहे.
मुलीसोबतच सुनेचाही या हत्येप्रकरणात सहभाग असल्याची माहिती समोर आली असून दोघींनाही पोलिसांनी अटक केली आहे. तानाबाई महादेव सावसाकडे (वय ६५) असे खून झालेल्या आईचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील नलेश्वर येथील निवासी तानाबाई सावसाकडे यांचा ३ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री खून असून त्यांचा अंत्यविधी गावातील स्मशानभूमीत करण्यात आला आहे. हा खून घरातीलच व्यक्तींनी केला असल्याची तक्रार मृत महिलेची मुलगी रंजना रामेश्वर सोनवणे हिने सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत ठाणेदार योगेश घारे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक महल्ले, घटनास्थळी दाखल झाला.
या प्रकरणात घरातील व्यक्तींवर मुलगी व सुनेवर गंभीर आरोप करण्यात आल्याने गावातून मृत महिलेची मुलगी वंदना खाते व सून चंद्रकला सावसाकडे यांना चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान दोन्ही महिलांनी पोलिसांना प्रारंभी या प्रकरणात उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखविताच पोटची मुलगी वंदना हिने तिचे आईला 3 ऑक्टोबर रोजी शेतीचे जमिनीचे कारणावरून झालेल्या भांडणामध्ये सून चंद्रकला हिला सोबतीला घेऊन आईचे नाक व तोंड दाबून क्रूरपणे ठार मारले. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गावात कोणालाही माहिती होऊ न देता अंत्यविधी जमिनीमध्ये उरकून मृतदेह जमिनीत पुरण्यात आल्याची कबुली दोघींनी दिली.
सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार योगेश घारे करीत आहेत.