Top News

चिंतामणी महाविद्यालयात जागतिक बुरशी (Fungus) दिन साजरा #chandrapur #pombhurna

पोंभुर्णा:- पोंभुर्णा येथील चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स येथे वनस्पतीशास्त्र विभाग तसेच आय क्यू ए सी तर्फे जागतिक बुरशी दिवस (World fungus day) साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्ताने फंगसवर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर हुंगे सर होते. प्रमुख पाहुणे व रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. अनंत देशपांडे प्राणीशास्त्र विभाग प्रमुख तसेच प्राध्यापक अमोल गर्गेलवार सूक्ष्मजीवशास्त्र विभाग हे होते.
याप्रसंगी अध्यक्ष डॉक्टर सुधीर हुंगे सर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, फंगस हा जमिनीची सुपीकता वाढविण्याकरता खूप फायदेशीर असतो. तसेच प्रा. अमोल गर्गेलवार सर आणि डॉ. अनंत देशपांडे सर यांनी सांगितले की फंगस हा असा सूक्ष्मजीव आहे जो आपल्याला दिसत नाही. पण तो फूड इंडस्ट्री मध्ये तसेच अँटीबायोटिक्स तयार करण्याकरिता पूर्ण जगभरात त्याचा उपयोग केला जातो. वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुप्रिया वाघमारे यांनी त्यांच्या प्रास्ताविक मध्ये फंगस डे साजरा करण्यामागील उद्देश सांगितला.
रांगोळी स्पर्धेमध्ये आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता कार्यक्रमाचे संचालन कार्तिक भुरसे यांनी तर आभार कुमारी काजल मंकीवार हिने मानले. यशस्वीतेसाठी प्राध्यापक शिक्षकेतर आणि विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने