दोन चिमुकलींवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद #chandrapur

चंद्रपूर:- गेल्या पंधरवड्यात आयुध निर्माणी सेक्टर ४ मधील वसाहतीत दोन चिमुकलींवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले. बिबट्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भद्रावती वनपरिक्षेत्रातील रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे.
चंद्रपूर येथील विभागीय वन अधिकारी खाडे, सहाय्यक उपवनसंरक्षक निकिता चौरे व वन परिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, बीट वनरक्षक धनराज गेडाम तथा वन कर्मचारी, सार्ड वन्यजीव संस्थेचे श्रीपाद भाकरे, अमोल कूचेकर, अनुप येरने, प्रणय पतरंगे, आशीष चायकाटे, इम्रान पठाण,शैलेश पारेकर आदींच्या सहकार्याने बिबट्यास जेरबंद करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत