चंद्रपूर:- दिनांक 15 व 16 ऑक्टोबर 2022 ला चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर 66 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या समारंभाला जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यांच्याकरीता अनेक स्वयंसेवी संस्था व संघटनांच्यावतीने दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची भोजनाची व्यवस्था चांदा क्लब ग्राउंड येथे करतात.
यावर्षी सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व स्वयंसेवी संस्था आणि संघटनांना आवाहन करण्यात आले आहे की, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या भोजनाची व्यवस्था करण्याकरीता भोजनदानाचे सर्व स्टॉल चांदा क्लब ग्राऊंडवरच लावावेत. दीक्षाभूमीच्या परिसरात किंवा मुख्य रस्त्यावर किंवा आजूबाजूला आपल्या भोजनाचे स्टॉल लावू नये, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.