Top News

उघड्या रोहित्राचा शॉक; चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू #dearhजिवती:- अंगणात खेळत असणाऱ्या चार वर्षीय मुलीला उघड्या रोहित्राचा शॉक बसल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जिवतीच्या पश्चिमेकडे ११ किमी अंतरावरील लांबोरी ग्रामपंचायत अंतर्गत बापुरावगुडा या आदिवासी गुडा येथे शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. ललिता भीमराव मडावी (४) असे मृत बालिकेचे नाव आहे.
शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ललिता अंगणात खेळत होती. घराशेजारील विद्युतपुरवठा करणारे रोहित्राचे झाकण उघडे होते. खेळत असताना ललिताचा स्पर्श रोहित्राच्या झाकणाला झाला. तिला विजेचा जोरदार झटका बसला. या विजेच्या धक्का बसला. तिला कुटुंबीयांनी लगेच रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांनी तिला मृत घोषित केले. जिवती पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने