पोंभूर्णा:- सातारा कोमटी नियत क्षेत्रातील जंगलात बुधवारला गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याचा गुरूवारला जंगलातील वनतलावात मृतदेह आढळला. सातारा तुकूम येथील रामभाऊ यशवंत मडावी वय ५२ वर्ष असे मृतकाचे नाव आहे.
सातारा तुकूम येथील रामभाऊ मडावी नेहमीप्रमाणे गुरे चराईसाठी जंगलात गेला होता. संध्याकाळ होऊनही तो घरी परतला नाही.त्यामुळे घरच्यांनी इकडे तिकडे शोधाशोध सुरू केली मात्र त्याचा पत्ता लागला नाही.गुरूवारला सकाळी सातारा कोमटी नियत क्षेत्रातील बिट क्रमांक ४३९ मध्ये असलेल्या वनतलावातावात बेपत्ता असलेल्या गुराख्याचा मृतदेह आढळला.
सदर मृतदेहाचे पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून नेमके मृत्यू कसे झाले याचा तपास केल्या जात आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत