Top News

सोनुर्ली गट ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा! #Chandrapur

सोनुर्ली व चिचबोळीच्या सर्वांगीण विकासासाठी लोकनेते ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजप कटिबद्ध:- जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
राजुरा:- कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांची जन्मभूमी असलेल्या सोनुर्ली व चिचबोळी गट ग्रामपंचायतीवर मागील ७५ वर्षांपासून असलेले कॉंग्रेसचे वर्चस्व मोडीत काढून भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे.
याठिकाणी सरपंच म्हणून भाजपाचे आनंदराव आत्राम आणि सदस्य म्हणून राहुल साळवे, निशा आत्राम, फोडूजी वलके, शकुंतला वलके, कविता टेकाम हे बहुमताने निवडून आले आहेत.

या विजयी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आज चिचबोळी येथे भेट देऊन सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
लोकनेते, विकासपुरुष, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात सर्वसामान्‍य जनतेसोबत जोपासलेल्या बांधिलकीमुळे व तळागाळातील सामान्‍य जनतेच्या हाकेला ओ देण्याच्या कार्यवृत्तीमुळेच हा विजय साकारला आहे. सरपंचांनी गावाच्या विकासासाठी विशेष कृती आराखडा तयार करून गावात प्राधान्याने करावयाच्या विकासकामांसाठी आता कामाला लागावे सोनुर्ली व चिचबोळीच्या सर्वांगीण विकासासाठी लोकनेते ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजप म्हणून आम्ही सर्व कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी याप्रसंगी केले.

स्थानिक कार्यकर्ते भाऊराव पा. ताजणे यांच्या घरी काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जिल्हाध्यक्ष भोंगळे यांनी ताजणे कुटूंबीयांंची सांत्वनपर भेट ही घेतली.

यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे, जिल्हा उपाध्यक्ष सतिश घोटे, जिल्हा सदस्य अरुण मस्की, प्रदिप बोबडे, श्यामा कारेकर, दिपक झाडे, अजय राठोड, स्वप्निल राजुरकर यांचेसह आदी मंडळी आवर्जून उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने