Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

ठाणेवासना येथील तांबा खाण प्रकल्पात स्थानीकांना रोजगार द्या- संदिप गिऱ्हे #chandrapur #pombhurna


पत्ररिषदेत दिला इशारा
पोंभूर्णा:- तालुक्यातील ठाणेवासना येथे अलिकडे तांब्याचे साठे असल्याचे आढळून आले आहे. ठाणेवासना येथील काॅपर ब्लाॅक भारतीय बहुराष्ट्रीय खाण क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेली वेदांता लिमिटेड कंपनीला लिज देण्यात आली असून कंपनीने प्राथमिक स्तरावरचे काम परिसरात सुरू केले आहे. मात्र सदर खाण कामावर स्थानिकांनाच काम देण्यात यावे जर स्थानिकांना यातून डावल्यास आम्ही खाण बंद पाडू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे यांनी पोंभूर्णा पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेत दिला आहे.

पोंभूर्णा तालुका वनवैभवाने नटलेला असून अंधारी व वैनगंगा नदी तालुक्याला वरदान म्हणून लाभलेले आहेत.तालुक्यात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.या संबंधाने जिओलाॅजी ॲण्ड मायनिंग आणि भारतीय भुवैज्ञानिक सव्हैक्षण यांच्या मदतीने ठाणेवासना येथील परिसरात प्राथमिक संशोधन करण्यात आले. ठाणेवासना ब्लाॅकमध्ये ८.०२ दशलक्ष टन तांब्याचा साठा मिळाला आहे.
स्थानिक प्रशासनाच्या अहवाला अंतर्गत शासनस्तरावरून प्रास्पेक्टींग व खाणकाम करण्यासाठी लिजचे निवीदा काढण्यात आले. यात भारतीय बहुराष्ट्रीय खाण क्षेत्रातील अग्रगण्य असलेली कंपनी वेदांता रिसोर्रेसेस लिमिटेड या कंपनीला प्रास्पेक्टींग व खाणकाम करण्यासाठी ठाणेवासना काॅपर ब्लाॅकची लिज देण्यात आली. ठाणेवासना परिसरातील ७६८.६२ हेक्टर एवढी जमीन वेदांता रिसोर्सेस लिमिटेडला ५० वर्षासाठी वाटप करण्यात आले. या प्रकल्पातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.
या प्रकल्पात स्थानिकांनाच रोजगार मिळाला पाहिजे.अकुशल रोजगारांना कुशल बनविण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जावे,व कुशल म्हणून कंपनीत रोजगार उपलब्ध करून दिले जावे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे यांनी पत्रकार परिषदेतून कंपनीला ईशारा देण्यात आले. यावेळी संदिप गिऱ्हे यांनी स्थानिक नाही तर खाण नाही अशी भूमिका घेत स्थानिकांना रोजगारापासून डावलण्याचा कंपनीने प्रयत्न केला तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे च्या वतीने मोठा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
पत्रपरिषदेत उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव,तालुका प्रमुख आशिष कावटवार,शहर प्रमुख गणेश वासलवार,आष्टाचे सरपंच किरण डाखरे,दिघोरी सरपंच वनीता वाकूडकर,घनोटीचे सरपंच यशोदा ठाकरे,घाटकुडचे माजी सरपंच गंगाधर गदेकार,वेळवाचे उपसरपंच जितेद्र मानकर,नगरसेवक अभिषेक बद्दलवार,बालाजी मेश्राम,कांता मेश्राम,रवी ठेंगणे,महेश श्रिगीरीवार व आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत