Top News

उमेद- तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तथा पंचायत समितीची सिंदेवाही अंतर्गत वेगवेगळे उपक्रम #sindewahi


दिवाळी फराळ साहित्य प्रदर्शनी व विक्री महोत्सवाचे आयोजन

सिंदेवाही:- दिनांक 17 ऑक्टोबर 2022 ला छत्रपती शिवाजी चौक सिंदेवाही ,माता चौक, नवर गावं ,बाजार चौक वासेरा परिसरात दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाला मा.श्री.अक्षय सुक्रे साहेब गट विकास अधिकारी प.स सिंदेवाही, मा. श्री. महाजनवार साहेब तालुका वित्त लेखा अधिकारी, श्री.अशोक बुरांडे सर विस्तार अधिकारी पंचायत, श्री.उद्धव मडावी तालुका व्यवस्थापक (BMIBCB),श्री.ज्ञानेश्वर मलेवार प्रभाग समनव्यक, श्री.संदीप उईके प्रभाग समनव्यक, कु.सविता उईके प्रभाग समनव्यक ,श्री.आशिष दरडे प्रभाग समनव्यक यांचे मार्गदर्शनात करण्यात आले. या दिवाळी फराळाचे उद्घाटन मा. श्री.सुकरें साहेब, गटविकास अधिकारी ,मा.श्री करनिकम बँक मॅनेजर (BOI) यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले.
🎆
दिवाळी निमित्त विविध वस्तूची खरेदी करताना ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ व इतर वस्तू यांची खरेदी करून ग्रामीण भागातील महिलांच्या उत्साह वाढवावा व त्यांच्या उत्पन्नात वाढ करावी असे आवाहन श्री.सुक्रे साहेब यांनी केले.
🎆
उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सिंदेवाही तालुक्यातील स्वयंसहायता समूह कार्यरत असून यातील अनेक महिला नाविन्यपूर्ण वस्तूची निर्मिती करतात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांकडून विविध खाद्यपदार्थ व सजावटीच्या वस्तू विक्रीस ठेवल्या आहेत.
🎆
छत्रपती शिवाजी चौक,सिंदेवाही, माता चौक, नवरगावं , बाजार चौक, वासेरा येथील परिसरात दुकान दिनांक 17 ऑक्टोंबर ते 21 ऑक्टोबर या पाच दिवसीय कालावधीमध्ये दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत. या पाच दिवसांमध्ये विविध वस्तू विक्रीस असणार आहेत भेट देणाऱ्या ग्राहकांनी ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू खरेदी कराव्यात जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक उलाढाल होईल व त्यांची दिवाळी आनंदीत होईल असे आवाहन केले गेले. सदर स्टॉल उभारणी करण्यास प्रभाकर मानकर,मयूर खोब्रागडे, सचिन लोंध्ये,हर्षद रामटेके यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने