Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

बघेल कुटुंबांना ना. मुनगंटीवारांचा मदतीचा हात

भाजपा पोंभुर्णाच्या वतीने दैनंदिन गरजेच्या धान्य किट, ब्लॅंकेट तसेच आर्थिक मदतीचे वाटप
पोंभुर्णा:- कसरगट्टा येथील जयसिंह बघेल वयोवृद्ध व्यक्ती आहे. घरी कुणीही कमावते व्यक्ती नाही, यांचे अति पावसामुळे घर कोसळले त्यात त्यांच्या घरातील काहीही सामान निघाले नाही, अशा परिस्थितीत दुःखात नेहमीच मदतीचा हात घेऊन उभे राहणारे नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री यांचे माध्यमातून दिवाळीच्या आनंदात त्यांना त्यांच्या कुटुंबाला मदत करावी यासाठी दैनंदिन गरजेच्या धान्य किट, ब्लॅंकेट तसेच आर्थिक मदत भाजपा पोंभुर्णाच्या वतीने देण्यात आली.
यावेळी अल्का आत्राम जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी, देवराव धोडरे, श्रीकांत वडस्कर, बंडू बुरांडे, अविनाश ढोंगे, भावना धोडरे, गणपतीजी कुणगाडकर, राजेश्वर धोडरे, नामदेव धोडरे, वंदना धोडरे महिला अध्यक्ष कसर्गट्टा उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत