Top News

सातारा कोमटी बिटात गस्ती दरम्यान आढळला वाघाचा मृतदेह #tiger #tigerdeath

पोंभूर्णा :- बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मानोरा उपवनक्षेत्रातील सातारा कोमटी नियत क्षेत्रातील बिट क्रमांक ४३९ मध्ये सामुहिक गस्ती दरम्यान नर वाघ मृत अवस्थेत आढळून आले. कुजलेल्या अवस्थेत असलेला मृत वाघ चार दिवसांपूर्वी मय्यत झाला असावा असा अंदाज वर्तवल्या जात आहे.
गुरूवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सातारा कोमटी बिटातील कक्ष क्रमांक ४३९ मध्ये सामुहिक गस्त करीत असतांना एक नर वाघ मृत अवस्थेत आढळून आला.साधारण तीन वर्षाचा नर वाघाचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झालाचा अंदाज वर्तवल्या जात आहे.वाघ कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे वाघाचे शवविच्छेदन जंगलातील वनतलावानजीक करण्यात आले.
सदर वाघाचे शवविच्छेदन पशूधन विकास अधिकारी डॉ.डि.पी.जांभुळे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशूधन विकास अधिकारी डॉ.कुंदन पोडचलवाल, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डु, राष्ट्रीय व्याघ्र प्रतिनिधी बंडू धोत्रे,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले.
वाघाच्या मृत्युचे नेमके कारण शोधण्यासाठी वाघाच्या अवयवांचे नमुने नागपूरला पाठविण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने