बल्लारपूर रेल्वे स्टेशनचा उडानपुल कोसळला chandrapur ballarpur


8 ते 10 जण गंभीर असल्याची माहिती


बल्लारपूर:- बल्लारपूर शहरामधील रेल्वे स्थानक आहे. बल्हारशाह स्थानक दिल्ली-चेन्नई ह्या प्रमुख मार्गावर असून येथून एक फाटा गोंदियाकडे जाते. जिल्यातील मोठे जंक्शन म्हणून बल्लारपूर रेल्वे स्टेशनची ओळख आहे. बल्लारपूर रेल्वे स्टेशन वरील पुल अचानक कोसळल्याने 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली. जखमी व्यक्तीचा आकडा वाढण्याची शक्यता आहेहा अपघात इतका भयंकर होता की कोसळलेल्या काही जणांचा रेल्वेच्या 2500 केव्हीं इलेक्ट्रिक लाईनला स्पर्श झाल्याने ते प्रवासी गंभीररित्या भाजल्या गेले असून उंचावरून कोसळल्याने सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन कामाला लागले असुन घटना कळताच स्थानकावर रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत