हत्तींनी बैलाला चिखलात तुडवून मारले. #Chandrapur #gadchiroli #korchi

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
कोरची:- तालुक्यातील तलवारगडमधील वृद्धाला जीवानिशी मारल्यानंतर जंगली हत्तींनी गांगीन या गावातील एका शेतकऱ्याच्या एका बैलाला चक्क पायांनी तुडवून चिखलात गाडले. या प्रकारामुळे शेतकरीवर्ग आणखीच भयभीत झाला आहे.
तलवारगडधील घटनेनंतर जंगली हत्तींच्या कळपाने गांगीन, प्रतापगडच्या दिशेने आगेकुच केली. या हत्तींनी गांगीनमधील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केले. त्यानंतर रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास हिरालाल चमरू नैताम यांच्या एका बैलाला पायाने तुडवून चिखलात गाडले. मृत बैलाचे चिखलात पूर्णपणे माखलेले पाय तेवढे ओळखायला येत होते. बैलाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.