युवा अभियंत्याची कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या #suicide #gadchiroli

Bhairav Diwase
0
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
गडचिरोली:- येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागात कार्यरत सहायक अभियंत्याने कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार (ता. ८) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. केशव गजानन आखाडे (वय २७) असे मृत अभियंत्याचे नाव आहे.
गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागच्या भागात बांधकाम विभागांतर्गत विद्युत विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयात केशव आखाडे हा सहायक वीज अभियंता म्हणून कार्यरत होता. मंगळवारी दुपारी कार्यालयात कुणीच नसताना त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. केशव हा अविवाहित होता.
घटनेनंतर पोलिसांनी मर्ग दाखल करुन मृतदेहाचा पंचनामा केला. पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. वृत्त लिहिपर्यंत केशव आखाडेच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)