Top News

शारीरिक शिक्षण व क्रीडा मंडळाच्या संचालिका डॉ. अनिता लोखंडे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी:- सिनेट सदस्य गुरुदास कामडी #chandrapur #gadchiroli



चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाने वार्षिक ऍथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा बोर्डाकडून कुठल्याही प्रकारचे नियोजन न करता ढिसाळ आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेच्या आयोजनासाठी विद्यापीठाने कोणत्याही प्रकारच्या समितीचे गठन करण्यात आलेले नव्हते. तसेच विद्यापीठाने अधिसभा (सिनेट) सदस्यांना विचारणा सुध्दा केली जात नाही. तसेच विद्यापीठांतर्गत कार्यरत शारीरिक शिक्षक प्राध्यापकांना विश्वासात न घेता या स्पर्धेचं ढिसाळ आयोजन केलेले होते. या सर्व परिस्थितीला विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा बोर्डाच्या संचालिका डॉ. अनिता लोखंडे याच जबाबदार असून, यांच्यामुळेच विद्यापीठावरती ही वेळ आलेली आहे. यापूर्वीही डॉ.अनिता लोखंडे यांनी कुणाला ही विश्वासात न घेता आपल्याच मनमर्जीने विद्यापीठाचा शारीरिक शिक्षण व क्रीडा बोर्डाचा भोंगळ कारभार चालवित आहेत. यामुळेच विद्यापीठावर अशा प्रकारची मानहानी व स्पर्धा रद्द करण्याची वेळ आलेली आहे. असा आरोप गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य गुरुदास कामडी यांनी केला आहे.
सदर स्पर्धा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील मैदानावर घेण्याचे ठरवले, परंतु नियोजना अभावी स्पर्धा एम. आय. डी. सी ग्राउंड वर घेण्याचे निर्देश देण्यात आले. या स्पर्धेसाठी गडचिरोली, चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यातून विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित झालेले होते

परंतु प्रत्यक्ष मैदानावर कुठलाच मंच तयार नव्हता. पिण्याचे पाणी ची सोय नव्हती, सावली सुद्धा नव्हती, खेळाडू जमेल त्या झाडाखाली स्वतःचे आणलेल्या दऱ्यावर बसले होते, तेवढेच नव्हे मुलींना कपडे बदलविण्यासाठी झाडांचा आडोश्याला जावे लागत होते. धावपट्टया सुद्धा व्यवस्थित नसून खडतर होत्या.
 

विद्यापीठाचे कुलगुरु किंवा त्यांच्यावतीने कुणीतरी जबाबदारी घेऊन कार्यक्रमाचे विस्तार उद्घाटन करून खेळाडू प्रतिनिधीच्या हातात जळती मशाल देण्याची रीत आहे. परंतु विद्यापीठाकडून कुठलीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याने दूर दुरुन आलेल्या खेळाडूंची नाराजी झाली व त्यांनी नियोजनाच्या बहिष्कार केला आणि घोषणा देत होते. तेव्हा कुलगुरुच्या कार्यालयावर धडकले. कारण काहीच नियोजन नसल्यामुळे संपुर्ण विद्यार्थी नाराज होते.

विद्यापीठाचे कुलगुरु किंवा त्यांच्यावतीने कुणीतरी जबाबदारी घेऊन कार्यक्रमाचे विस्तार उद्घाटन करून खेळाडू प्रतिनिधीच्या हातात जळती मशाल देण्याची रीत आहे. परंतु विद्यापीठाकडून कुठलीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याने दूर दुरुन आलेल्या खेळाडूंची नाराजी झाली व त्यांनी नियोजनाच्या बहिष्कार केला आणि घोषणा देत होते. तेव्हा कुलगुरुच्या कार्यालयावर धडकले. कारण काहीच नियोजन नसल्यामुळे संपुर्ण विद्यार्थी नाराज होते. विद्यापीठ अंतर्गत खेळात उत्तम खेळाडूंची निवड करुन औरंगाबाद येथील होणाऱ्या अश्वमेध स्पर्धेत पाठवले जाणार होते. त्यातून पुढे देशव्यापी वर या विद्यार्थ्यांमधून खेळाडूंना खेळवले जाऊ शकतील, परंतु अजूनही उद्घाटन न झाल्याने गोडवाना विद्यापीठातील स्पर्धक अश्वमेघात सहभागी होऊ शकतील का? असे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे

     या स्पर्धेवरती केंद्र व राज्य शासनाकडून किती निधी आलेला आहे. स्पर्धेच्या आयोजनावर किती निधीं खर्च केल्या गेला? शारीरिक शिक्षण व क्रीडा बोर्डाच्या संचालिका डॉ. अनिता लोखंडे यांनी या स्पर्धेचे आयोजनासाठी कोणती समिती गठीत केलेली होती? याची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य गुरुदास कामडी यांनी केलेले आहे.  
     

आगामी विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) मध्ये या विषयावरती चर्चा घडवून आणून डॉ. अनिता लोखंडे यांच्या वरती कठोर कारवाई करावी. तात्काळ चौकशी समिती गठीत करून सदर प्रकरणाची तात्काळ चोकशी करावी. अशी मागणी सुद्धा गुरुदास कामडी यांनी केलेली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने