Top News

बापरे! वर्गमित्राच्या डोळ्यात थेट पेन्सिल भोसकली; शस्त्रक्रियेनंतरही दृष्टी धोक्यात #chandrapur #gadchiroli


सिरोंचा:- शाळेत (School) खेळताना एका पहिलीतील विद्यार्थ्याने (student) आपल्या वर्गमित्राच्याच डोळ्यात पेन्सिल (Pencil) भोसकली. ही धक्कादायक घटना गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील सिरोंचा (Sironcha) तालुक्यातील राजीवनगर (Rajivnagar)  येथील कारमेल अकादमीत (Caramel Academy) उघडकीस आली. पेन्सिलमुळे विद्यार्थ्याच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून शस्त्रक्रियेनंतर (Surgery) डॉक्टरांनी (Doctor) देखील चिंता व्यक्त केली आहे.


राजीवनगर येथील कार्मेल अकादमी शाळेतील पहिल्या वर्गात शिकत असलेल्या सात्विक रमेश मारगोनी याच्या डाव्या डोळ्यात त्याच्याच वर्गमित्राने खेळता खेळता टोकदार पेन्सिल भोसकली. यामुळे डोळ्यातून रक्तस्त्राव झाला. दुखापत गंभीर असल्याने विद्यार्थ्याच्या पालकांनी मुलाला हैदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. येथे त्याच्यावर दोन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, दुखापत गंभीर असल्याने सत्विकची दृष्टी पूर्ववत येईल का याबाबत डॉक्टर देखील ठाम नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्याचे पालक चिंतेत सापडले आहेत. घटनेनंतर पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे. त्यांच्या मते सदर बाब लक्षात येताच शाळा प्रशासनाने तात्काळ आम्हाला कळवायला हवे होते. पण त्यांनी उशिरा घटनेची माहिती दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने