राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी हंसराज अहीर #chandrapur #Hansrajahir

Bhairav Diwase


चंद्रपूर:- माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर (Hansraj Ahir) यांची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून निवड करण्यात आली आहे.

अहीर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे चारदा प्रतिनिधित्व केले. केंद्र सरकारच्या विविध समित्यांवरून आपल्या संसदीय कारकिर्दीत उल्लेखनीय कार्य केले. संघटनात्मक कार्यातून ओबीसी, भटके विमुक्त व अल्पसंख्याक समुदायाला भाजपशी जोडण्याचे भरीव कार्य केले.

मागासवर्गीय समाजाला न्याय्य हक्कांची जाणीव करून देत संघटन उभे केले. या कार्याची दखल घेत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.