जिवती तालुक्यात अत्याधुनिक अभ्यासिका निर्माण करा #chandrapur #Jivati #sudhirmungantiwar #statement

Bhairav Diwase

दयानंद राठोड यांची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी
chandrapur, pombhurna, Bhairav Diwase, Adharnewsnetwork, Maharashtra, India, Vidharbh, Adharnewsnetwork
जिवती:- राजूरा (Rajura) तालुक्याचे विभाजन करून शासनाने सन २००२ मध्ये जिवती (Jivati) तालुक्याची निर्मीती केली. आज घडीला तालुक्यात ८४ गावे असून ही गावे विविध समस्यांनी ग्रासलेली आहेत. त्या मूळे हा तालुका नेहमी चर्चेत असतो, जवळ जवळ २० वर्षे लोटल्यानंतरही जिवती तालुक्याचा आणि तालुक्यातील गावांचा विकास झाला नाही.

"वाचाल तर वाचाल" हा सुविचार आपण लहानपणापासून ऐकला आहे. हा सुविचार आपल्याला वाचनाचे महत्व पटवून देतो, परंतु जिवती तालुक्यात वाचनालय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाकरीता खुप अडचण जाते. MPSC व UPSC या महत्त्वाच्या परिक्षा पास होण्यात जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. तो वाढविण्यासाठी जिवती तालुक्यात अत्याधुनिक अभ्यासिका निर्माण करणे खूप आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपल्याला आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी चांगल्या अन्नाची गरज असते, त्याच प्रमाणे मन निरोगी ठेवण्यासाठी व मेंदूचा विकास होण्यासाठी वाचनाची गरज असते.

जिवती तालुकायातील विद्यार्थ्यांचे MPSC व UPSC च्या परिक्षे मध्ये प्रमाण वाढविण्यासाठी जिवती तालुक्यात अत्याधुनिक अभ्यासिका निर्माण गरजेचे आहे. अशी दयानंद राठोड यांनी चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhirmungantiwar) यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.