विनयभंग प्रकरणी फरार आरोपीला अटक #chandrapur #Korpana #Gadchandur


गडचांदूर पोलिसांची कारवाई
गडचांदूर:- गडचांदूर येथील गुन्हेगार अब्दुल खलील अब्दुल रशीद शेख वय वर्ष 24 हा मागील काही दिवसापासून गडचांदूर येथील एका महिलेचा विनयभंग करून फरार झाला होता.
दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे गडचांदूर पोलिसांनी सदर आरोपीचा वाशिम, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात शोध घेऊन 7 नोव्हेंबर रोजी त्याला ताब्यात घेऊन विनयभंग व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली व चंद्रपूर येथे न्यायालयात हजर केले.
विद्यमान न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली असून सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यजित आमले व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत