बेपत्ता असलेल्या इसमाचा अखेर मृतदेहच आढळला #chandrapur #Nagbhid

Bhairav Diwase


नागभीड:- बाम्हणी येथील बेपत्ता असलेल्या 'त्या' वयोवृद्ध इसमाचा अखेर मृतदेहच शुक्रवारी सायंकाळी आढळून आला. अशोक निनावे (६५) असे मृतक इसमाचे नाव आहे. अशोक हे तीन-चार दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. याबाबतची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती. शुक्रवारी संध्याकाळी बाम्हणी शिवारातील रेल्वेलाईन जवळील नाल्यात नागरिकांना अशोक हा मृतावस्थेत आढळून आला. ही माहिती पोलिसांना देण्यात आली.
बल्लारपूर रेल्वे स्टेशनचा उडानपुल कोसळला


माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. मृतकाच्या पश्चात पत्नी व दोन मुलं आहेत. पुढील तपास नागभीड पोलिस करीत आहेत.