Top News

मिरचीच्या सातऱ्यावर फुलले प्रेम, अडकले विवाह बंधनात #chandrapur #sindewahi

सिंदेवाही:- माणूस म्हणून जगताना कोण कुठल्या वळणावर मिळेल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार घडला मिरची सातऱ्यावर गेलेल्या तरुणांसोबत घडला. मिरची करताना दोघांची नजरेवर नजर भिडली. बघता बघता प्रेमात रुपांतर झाले. मात्र जात आडवी आली. त्यावर मात करीत सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेच्या पुढाकाराने हे प्रेमीयुगुल विवाहबंधनात अडकले.
सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील सूरज दिलीप सहारे व द्रौशिका मधुकर चौधरी नवेगाव चक, हे कुटुंबियासह पोटाची खळगी भरण्यासाठी भिवापूर तालुक्यात मिरचीच्या साताऱ्यावर गेले. मिरची करताना दोघांची नजरावर नजर झाली. त्यांच्यात प्रेम फुलले. त्यांनी एकत्र जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या. परंतु दोघांचीही जात वेगळी असल्याने घरच्या व नातेवाईकांचा लग्नाला विरोध निर्माण झाला.
दरम्यान दोघांनी नवरगाव येथील सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेकडे विवाहासाठी अर्ज केला. त्यांनी कागदपत्रे पडताळणी करून त्यांचे लग्न लावून दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमोल निनावे, बंटी नैताम, जालिंदर गायकवाड, राहुल बोरकर, जगदीश रामटेके, गुड्डू गौडाने, मुलाचे नातेवाईक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने