वरोरा:- नागपूर-चंद्रपूर मार्गावरील येन्सा गावाच्या शिवारात रस्ता ओलांडत असताना ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. गोकुळदास वामन पाटील (६०, रा. कर्मवीर वॉर्ड, वरोरा) असे मृतकाचे नाव आहे.
गोकुळदास पाटील हे आपल्या नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी बांद्रा या गावात जात होते. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील येन्सा गावाजवळ रस्ता ओलांडताना एमएच ३२ केयू ७९८० या क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.