वेकोलितून कोळसा चोरणारे दोन हायवा ट्रक जप्त #chandrapur #ballarpur


चालकाला अटक; एकजण फरार

बल्लारपूर:- बल्लारपूर वेकोली क्षेत्रातून कोळसा चोरून नेणारे भुरटे चोर प्रसिद्ध आहेत; परंतु मोठ्या हायवा ट्रकमधूनही कोळसा चोरणारी टोळी बल्लारपूर कोळसा खाणीत सक्रिय असल्याचे चौकीदाराने उघडकीस आणलेल्या कारवाईतून पुढे आले. बल्लारपूर पोलिसांनी सोमवारी (दि. १४) रात्री दोन हायवा ट्रक जप्त करून एका हायवाचालकाला अटक केली; तर दुसरा फरार झाला. विशाल नारायण येतमवार (३६, रा. श्रीराम वॉर्ड) असे आरोपी चालकाचे नाव आहे.
बल्लारपूर वेकोलीअंतर्गत सास्ती खुल्या खाणीत निघालेला कोळसा बल्लारपूर रेल्वे साइडिंगवर आणून टाकण्याचे काम एका खासगी कंपनीकडे आहे; परंतु तसे न होता ट्रकचालक कोळसा भरून आणतात आणि रेल्वे साइडिंगवर खाली न करता दुसरीकडे टाकतात. ही बाब रेल्वे साइडिंगचा इनचार्ज व चौकीदार कल्याण काकूमनू याच्या लक्षात आला. त्यांनी रेल्वे साइडिंगच्या विरुद्ध दिशेने येणारे एमएच ४० सीडी ६०१९ व एमएच ४० ६०१८ हे दोन्ही हायवा ट्रक पकडून सोमवारी रात्री पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी श्रीराम वॉर्डातील विशाल नारायण येतमवार (३६) या चालकाला अटक केली. दुसरा चालक फरार आहे. कोळसामाफियांचे धाबे दणाणले आहेत. पुढील तपास ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात एपीआय विकास गायकवाड करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत