Top News

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन च्या माध्यमातून बालपंचायतीने साजरा केला बालक दिवस.



(आधार न्युज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात  मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपुर संस्थेच्या वतीने चंद्रपूर तालुक्यात  "SCALE" कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा कार्यक्रम मागील अनेक वर्षा पासून सातत्याने राबविला जात आहे. 


त्याच अनुषंगाने दि. १४  नोव्हेंबर २०२२ पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त बालक दिवस जिल्हा परिषद शाळेत साजरा केला त्यात चंद्रपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा अजयपुर, चीचपल्ली, बोर्डा, चेकनिंबाडा, जूनोना, लोहारा, बेलसानी, चींचाला, खुटाडा, दाताडा, वेंडली, सिदुर ,  कन्या शाळा घुगुस ,  हिंदी शाळा घुगुस, प्रियदर्शनी कन्या शाळा घुगुस,जनता शाळा दुर्गापूर 
या सर्व शाळेमध्ये  बालक दिवसा निमित्याने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा , कविता लेखन , निबंध स्पर्धा ,थ्रो बॉल,  घेण्यात आले .


कार्यक्रमाचे फलस्वरूप असे की, स्पर्धेचे आयोजन करण्यामागचा महत्वाचा हेतू म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना बालकांना त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा , मार्गदर्शन मिळावा हा होता. 
आपण वर्षातील ३६५ दिवसांचे दिनविशेष पाहिल्यास लक्षात येईल की रोज कुठला ना कुठला 'खास दिवस' असतो. दर वर्षी १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्‍मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो. केवळ भारतातमध्ये बालदिन १४ नोव्हेंबरला साजरा केला जातो.
         
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळा साहाय्यक अधिकारी *नालंदा बोथले, पायल राजपूत ,संदेश जुनारकर, सतीश खंडारे , गंगाधर जाधव, गणेश दुधबडे* व मॅजिक बस संस्थेचे *समुदाय समन्वययक* यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने