आशिष ताजने यांची भाजयुमोच्या नवमतदार नोंदणी अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी नियुक्ती #chandrapur

सदर अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ज्या युवक-युवतींचे १८ वर्ष वय पूर्ण झालेले आहे त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून नोंदणी केली जाणार आहे. यामाध्यमातून जिल्ह्यातील युवक युवतींना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे,सदर अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक मंडळ स्तरावर संयोजक नियुक्त करून प्रत्येक बूथ स्तरावर सदर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत