वाघाच्या हल्ल्यात ५५ वर्षीय महिला ठार #Chandrapur #bramhapuri

ब्रम्हपुरी:- शेतात गेलेल्या एका ५५ वर्षीय महिलेवर वाघाने प्राणघातक हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. ब्रम्हपुरी तालुक्यातील टेकरी (तोरगाव) येथील शेतशिवारात गुरुवारी (३ नोव्हेंबर) दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जाईबाई तुकाराम तोंडरे असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिलेचे शिर धडापासून वेगळे केल्याने तिच्यावर हल्ला करणाऱ्या वाघांची संख्या एकपेक्षा जास्त असल्याची चर्चा तोरगाव परिसरात सुरू आहे. अत्यंत क्रुरपणे आणि थरारक घटनेमुळे ब्रम्हपुरी तालुक्यात मोठी दहशत पसरली आहे.
ब्रह्मपुरी उत्तर वनपरिक्षेत्रांतर्गत तोरगाव (बुज) येथील जाईबाई तुकाराम तोंडरे या महिलेचे गावापासून काही अंतरावर शेत आहे. गुरुवारी सकाळी जाईबाई एकट्याच शेतावर गेल्या होत्या. शेतातील बांधामध्ये पडलेला सरवा वेचत असताना शेतालगत दबा धरून असलेल्या वाघाने या महिलेवर हल्ला केला. अत्यंत क्रूरपणे थरारक हल्यात वाघाने महिलेचे धडापासून शिर वेगळे केले. मृतदेहाच्या परिस्थितीवरून एकापेक्षा जास्त वाघांनी महिलेवर हल्ला करून ओढत नेल्याची चर्चा गावात सुरु आहे. दुपारी 1 वाजताच्या सुमारास सर्व कुटूंबिय शेतावर गेल्यानंतर महिलेच्या मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. गावात घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी उसळली. ब्रम्हपुरी वनविभागाला महिलेच्या मृत्यूची माहिती देण्यात आली.
वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड, क्षेत्र सहाय्यक एम. एच. सेमस्कर आदी घटनास्थळी दाखल हाते. वनविभागाने मृतेदहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीकरीता ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात पाठविले. वनविभागाने तातडीने मृत महिलेच्या कुटूंबियांना २५ हजाराची मदत केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत