राष्ट्रवादीला दुसरा धक्का; महिला जिल्हा अध्यक्षांनी दिला राजीनामा #chandrapur


चंद्रपूर:- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ( ग्रामीण ) राजेंद्र वैद्य यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याला काही तास उलटले नसताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा बेबीताई उइके यांनी राजीनामा दिला आहे. या दोन राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीच्या बेबीताई उईके या सामान्य कुटंबातील आहेत. कुठलाही राजकीय वारसा नसतांना त्यानी राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली. स्वतःला पक्षासाठी झोकून दिलं. त्यांचे प्रामाणिक कार्याची शरद पवार यांनी कौतुकही केलं आहे. आज त्यांनी दिलेल्या अचानक दिलेला राजीनामा कार्यकर्त्यांना मोठा धक्का ठरला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत