ग्रामपंचायत.... #Grampanchayat

Bhairav Diwase
0


गावातील ग्रामपंचायत ला
विसर पडला पैशाचा l
जनता सोडली वाऱ्यावर
विचार फक्त स्वतःचा l

ग्रा. पं. प्रशासन म्हणतात
कामे नियमित होणार l
पण वारंवार सांगून ही
ते लक्षच नाही देणार l

कामे गावची चालू असता
ग्रामपंचायत दखल ना घेई l
कामही कशाला बघायचे
हरकत हि कुणा नाही l

गैरमार्गे ग्रामसभा घेणे
गैरच पद्धत ग्रामपंचायतची l
कोणीतरी गावात असावा
चांगली अद्दल घडवण्याची l

ग्रामसभा भरली की
एकमेकांकडे बोटे दाखवतात l
मूळ प्रश्न सोडून देती
भलतंच विषय हाताळतात l

गावाचा विकास
असा नाही होणार l
जो पर्यत गावकरी
एकत्र नाही येणार l

रचना-अजय द.राऊत
मो. नं.8999661685

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)