Top News

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन हवे:- भीमराव पवार #Korpana #Chandrapur

BREAKING NEWS व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा.
👇👇👇👇👇👇


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा (Competitive Examination) मार्गदर्शन पर कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे (time) योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असून,जो विद्यार्थी वेळेचे योग्य व्यवस्थापन करून तयारी करतो तो स्पर्धा परीक्षा क्षेत्रात नक्कीच यशस्वी होतो असे प्रतिपादन आर्या दि बेस्ट अकॅडमीचे संचालक माननीय भीमराव पवार यांनी केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. नानेश्वर धोटे,प्रमुख मार्गदर्शक मा.भीमराव पवार सर, प्रमुख अतिथी प्रा.पंकज देरकर प्रा.कु. मनीषा मरसकोल्हे,प्रा.कु. रेणू मॅडम स्पोर्ट प्रतिनिधी सौरभ विरुटकर उपस्थित होते.अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी महाविद्यालय हे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सतत अनेक उपक्रम राबवत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे उपक्रम संजीवनी ठरत आहे.असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून प्रा.पंकज देरकर यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महाविद्यालयाच्या योगदानाबद्दल माहिती दिली.

महाविद्यालयीन विध्यार्थी नेहा लांडे हिने आजपर्यंत महाविद्यालयातर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली.संचालन प्रा.एजाज शेख यांनी केले.तर आभार प्रा.मनीषा मरसकोल्हे हिने मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज तलांडे,वर्ग प्रतिनिधी प्रतीक्षा चिंचोलकर,सांस्कृतिक प्रमुख पूनम चौधरी, महिला प्रतिनिधी मयुरी कोल्हे व उपस्तिथ विध्यार्थ्यानी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने