खरेदीदारांकडून होते शेतकऱ्यांची लुट
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही (Sindewahi) तालुक्यातील वासेरा येथील धान्य उत्पादकांची इलेक्ट्रॉनिक काट्याने धान मोजण्याची मागणी तहसीलदार यांचेकडे केली आहे. ग्रामीण भागात धान खरेदी करत्तांना व्यापारी हा जुना पद्धतीच्या काट्याचा वापर करतात. त्याचप्रमाणे दोन, तीन किलो धान हे पोत्याच वजन व पुरवणी म्हणून घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच गळंचेपी पूर्वी पासून सुरु आहे. मात्र याकडे संबधित अधिकारी व प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे वासेरा गावातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय सिंदेवाही येथे जाऊन तहसीलदार यांच्याकडे ह्या समस्येच निराकरण करण्यासाठी साकडे घातले आहे.
दर वर्षाच्या तुलनेत यावर्षी धानाचे उत्पादन खूपच कमी झाले आहे. अश्याही परिस्थितीत व्यापाऱ्यांकडून होणारी लुट ही न परवडणारी आहे. धानपिकाला लागलेला खर्च हा उत्पनातून मिळणं अवघड आहे. तेव्हा आपण तालुक्याचे न्यायदंडाधिकारी व तहसीलदार असून शेतकऱ्यांच्या या समस्येची तात्काळ दखल घेऊन न्याय द्यावा ह्या अपेक्षेने शेतकरी प्रतीक्षेत आहेत.