कार्यालयीन महिला कर्मचारीचा विनयभंग #Woman #Molestation #chandrapur #gadchiroli


जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्यास अटक

#Woman #Molestation #chandrapur #gadchiroli

गडचिरोली:- कार्यालयीन महिला कर्मचारीचा विनयभंग (Woman Molestation) केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या (Gadchiroli Zilla Prishad) मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्याला गडचिरोली पोलिसांनी सोमवारी अटक केली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Crime News)

ओंकार रामचंद्र अंबपकर (रा. गुलमोहर कॉलनी, गडचिरोली) असे आरोपी लेखा तथा वित्त अधिकाऱ्याचे नाव आहे. पीडित महिला ही गडचिरोली (gadchiroli) जिल्हा परिषदेत कार्यरत आहे. अंबपकर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने पीडित महिलेला आपल्या केबिनमध्ये बोलवून विनयभंग करायचे. 16 ते 20 नोव्हेंबर यादरम्यान कामाच्या बहाण्याने आपल्या केबिनमध्ये चार वेळा बोलून सतत विनयभंग केला, अशी तक्रार पीडित महिलेने गडचिरोली पोलीस ठाण्यात दिली.

यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून लपून बसलेल्या अधिकारी अंबपकर याला मोठ्या शिताफीने अटक (Arrested) केली. त्याला मंगळवारी न्यायालयात (Court) हजर केले जाणार आहे, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधिकारी अरविंद कतलाम यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत