अजय आत्राम या विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरीय खो-खो स्पर्धेत निवड #chandrapur

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालयातील विद्यार्थी अजय आत्राम (Ajay Atram) याची कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ तर्फे आयोजित औरंगाबाद (Aurangabad) येथील विद्यापीठ स्तरीय खो खो स्पर्धेत निवड झाली आहे. अजय आत्राम हा विद्यार्थी प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षाला शिक्षण घेत असून आजपर्यंत त्यांनी अनेक स्पर्धेत सहभाग घेऊन यश प्राप्त केले आहे.

महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा वर्गाबरोबर रोज सकाळी विद्यार्थ्यांसाठी फिजिकल व संपूर्ण खेळाची तयारी सुद्धा करून घेतल्या असल्याने आज महाविद्यालयाचे अनेक विध्यार्थी शासकीय नोकरी बरोबरच विविध खेळात प्राविण्य प्राप्त करताना दिसून येत असल्याचे मत प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी व्यक्त केले.

या यशाचे श्रेय अजय आत्राम याने प्राचार्य धोटे सर,प्रा.पंकज देरकर, प्रा.एजाज शेख, यांना दिले असून महाविद्यालयातून मिळणाऱ्या सहकार्यासाठी त्याने आभार व्यक्त केले. व पुढील होणाऱ्या खो-खो स्पर्धेत यश प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव उंचावण्याचा त्याने आशावाद व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत