अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार #chandrapur #Bramhapuri #Accident #milk #youth


#chandrapur #Bramhapuri #Accident #milk #youth

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
ब्रम्हपुरी:- मालडोंगरी येथील मावशीच्या घरी (House) नेहमीप्रमाणे दूध (Milk) आणण्यासाठी जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक (youth) जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

करण धनिराम माकडे (२४, रा. झिलबोडी) असे मृतकाचे नाव आहे. तालुक्यातील झिलबोडी येथील करण माकडे हा मालडोंगरी (Maldongari) येथील मावशीच्या घरून दूध आणून ब्रम्हपुरी (Bramhapuri) येथे वाटप करायचा. नेहमीप्रमाणे दूध आणण्यासाठी जात असताना नाल्याजवळ अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर घटनास्थळावरच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलिसांना देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत