गोंडपिपरीत राज्यपाल भगतसिंग कोशारींच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक #chandrapur #gondpipari

Gondpipari, chandrapur, shivsena (uddhav balasaheb Thackeray)

गोंडपिपरी:- औरंगाबाद संभाजी नगर येथे दोन दिवसांपूर्वी दिक्षांत समारंभ कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल एकेरी शब्द वापरत जुन्या काळातील हिरो (Hero) असा उल्लेख करत नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याशी तुलना केल्याने गोंडपिपरीत (Gondpipari) शिवसैनिक (Shivsainik) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दि. २१ नोव्हेंबरला (November) सोमवारी राज्यपाल कोशारी (Rajyapaal Koshari) यांच्या विरोधात घोषणा देत छत्रपती शिवाजी चौकात निषेध करण्यात आले.


यावेळी शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena uddhav balasaheb Thackeray) तालुका प्रमुख सुरज माडुरवार, शहर प्रमुख रियाज कुरेशी, जेष्ठ शिवसैनिक संजय माडुरवार, अशपाक कुरेशी,तालुका उपप्रमुख विवेक राणा, युवासेनेचे तुकाराम सातपुते, युवासेना तालुका उपप्रमुख गौरव घुबडे, दिनेश बांबोडे, गनेश रामगिरकर, देवा शेंडे, जाकीर शेख, किरण येणगंटीवार, प्रेमदास मुंजनकर, विकास मुंजनकर, विनोद तिर्थवार, मिलिंद खोब्रागडे, पोपेश जुनघरे, वडकुली शाखा प्रमुख प्रशांत खेडेकर उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत